दोन दिवसात दोघांची हत्या
By Admin | Updated: May 6, 2017 23:21 IST2017-05-06T23:21:26+5:302017-05-06T23:21:43+5:30
घोटी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन दिवसात दोघा जणांची विविध कारणावरून हत्या झाल्याने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसात दोघांची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन दिवसात दोघा जणांची विविध कारणावरून हत्या झाल्याने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटीजवळील कुलॅण्ड या गजबजलेल्या परिसरात काशीनाथ मंगळू पथवे (वय ४०) रा. धार्नोली या इसमाचा जखमी अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. दरम्यान, अधिक तपासाअंती या इसमाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने घोटी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरु द्ध गुन्हा दाखल केला होता.
याबाबत एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच धामणीच्या गांगडवाडी येथील किसन बारकू गांगड व त्याची पत्नी मंगला किसन गांगड यांच्यात शुक्र वारी मध्यरात्री जोरात भांडणं होऊन यात किसनने रागाच्या भरात पत्नी मंगलाची हत्या केल्याची घटना घडली. याबाबत घोटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे, सुनील पवार, सुहास गोसावी आदी करीत आहेत.