वायू प्रदूषण तपासणीची आणखी दोन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:16 AM2019-12-22T01:16:20+5:302019-12-22T01:16:56+5:30

राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.

 Two more air pollution detection centers | वायू प्रदूषण तपासणीची आणखी दोन केंद्रे

वायू प्रदूषण तपासणीची आणखी दोन केंद्रे

Next

नाशिक : राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.
शनिवारी (दि.२१) महापालिकेच्या पर्यावरण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील १७ शहरात होणाºया प्रदूषणाच्या अनुषंघाने निवड केली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे घटक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र
सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आराखडा सादर केला असून,
तो केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतर आता शासनाच्या आदेशानुसार समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २१) पार पडली. यावेळी काही ठोस निर्णय घेण्यात आले.
शहरात सध्या वायू प्रदूषणाची तपासणी करणारी पाच प्रदूषण मापन केंद्रे असून, आता महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात आणि त्यानंतर गुरुगोविंद सिंग कॉलेजजवळ असे दोन सेंटर म्हणजेच प्रदूषण मापनाची केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
शहरात प्रदूषण वाढू नये यासाठी कारंजा असलेली वाहतूक बेटे निर्माण करण्यात येणार असून, व्हर्टिकल गार्डन ही कल्पना राबविण्यात येणार आहे. व्हर्टिकल गार्डन म्हणजेच भिंतीवरील हिरवळ असून, अनेक मॉल्समध्ये ती आढळते. बैठकीस महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पर्यावरण अधिकारी, औद्योगिक संघटना आणि विशेषत: सीईटीपी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Two more air pollution detection centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app