सिंहस्थासाठी आलेले दोन भाविक बेपत्ता
By Admin | Updated: September 1, 2015 22:30 IST2015-09-01T22:30:21+5:302015-09-01T22:30:50+5:30
सिंहस्थासाठी आलेले दोन भाविक बेपत्ता

सिंहस्थासाठी आलेले दोन भाविक बेपत्ता
नाशिक : सिंहस्थासाठी नाशकात आलेले दोन भाविक बेपत्ता झाले असून, त्यामध्ये एक वीसवर्षीय मुलगी, ४५ वर्षीय इसमाचा समावेश आहे़ या प्रकरणी भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़
२९ तारखेच्या पर्वणीच्या दिवशी ओरिसा येथील रहिवासी विभूती भूषण बेहरा, भाऊ बिनय भूषण मेहरा व कुटुंबासह नाशिकला आले होते़ पर्वणीच्या दिवशी भद्रकालीतील साक्षी गणपती मंदिराजवळून जात असताना रस्ता चुकून बिनय बेहरा बेपत्ता झाले़ ते शरीराने मध्यम, रंग निमगोरा, उंची ५ फूट ६ इंच, अंगात लाईट ब्ल्यू शर्ट व ब्राऊन कलरची पँट घातलेली आहे़
पर्वणीच्या दोन दिवस अगोदर गुजरातहून उमेश प्रभुनाथ पांडे (रा़ डोंगरा कॉलनी, वापी) हे कुटुंबासह नाशिकला आले होते़ बुधवारी (दि़२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते कुटुंबासह रामकुंडावर अंघोळीसाठी गेले होते़ कुटुंबातील सदस्य अंघोळीसाठी गेले असताना त्यांची २० वर्षीय मुलगी भारती उमेश पांडे ही कपडे सांभाळत होती़; मात्र स्नान आटोपून आले असता भारती तेथे नव्हती़
बेपत्ता भारती ही रंगाने गोरी, उंची ५ फूट ३ इंच, शरीराने सडपातळ, अंगात पंजाबी ड्रेस त्यात तपकिरी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची सलवार घातलेली आहे़ याबाबत उमेश पांडे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़