ट्रक उलटून दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:36 IST2020-03-09T12:36:15+5:302020-03-09T12:36:24+5:30

नांदूरवैद्य -: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे जात असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.९) सकाळी ७१.५ च्या सुमारास घडली.

 Two men were seriously injured when the truck overturned | ट्रक उलटून दोघे गंभीर जखमी

ट्रक उलटून दोघे गंभीर जखमी

नांदूरवैद्य -: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे जात असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.९) सकाळी ७१.५ च्या सुमारास घडली. जखमींना गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरून नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना ट्रक क्र मांक (एम.एच.१५. जी.यू.०३८१) या ट्रकवरील चालकाचे सकाळच्या वेळी नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटल्यामुळे झालेल्या अपघातात अजेदानी मुस्ताकिम अन्सारी (३६), जब्बर जिवरेल अन्सारी (४५, आंध्रप्रदेश) हे दोघे जण चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहे. सदर अपघाताची माहिती वाडीव-हे पोलिसांना समजताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अधिक तपास वाडीव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना दूरध्वनीवरून मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title:  Two men were seriously injured when the truck overturned

टॅग्स :Nashikनाशिक