मोहाडी येथे दोन बिबटे पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:27 PM2020-10-24T23:27:32+5:302020-10-25T01:35:32+5:30

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत संतोष तिडके यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसात चार बिबटे अडकल्याने मोहाडी परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Two leopards in a cage at Mohadi | मोहाडी येथे दोन बिबटे पिंजऱ्यात

मोहाडी येथे दोन बिबटे पिंजऱ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देदिंडोरी : दोन दिवसात अडकले चार बिबटे

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील कोराटे रस्त्यालगत संतोष तिडके यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसात चार बिबटे अडकल्याने मोहाडी परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहाडी व परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, त्यांनी काही दिवसांपूर्वी श्वानांना भक्ष्य केले होते, त्यानंतर येथील नागरिकांनी वनविभागास पिंजरा लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार वनविभागाने सोमवारी (दि. १९) पिंजरा लावला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.२२) दीड वर्षाचा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. शुक्रवारी (दि. २४) पुन्हा तीन वर्षाचा एक बिबट्या त्याच पिंजऱ्यात अडकला होता. दोन्ही बिबटे वनविभागाने ताब्यात घेत त्यांची नाशिकला रवानगी केली होती, त्याच ठिकाणी अजूनही बिबटे असल्याच्या संशयावरून वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला असता शनिवारी (दि.२४) पहाटे त्या पिंजऱ्यात दीड वर्षाचे दोन बिबटे अडकले.
या बिबट्याची मादी पकडण्यासाठी वनविभागाने व्यूव्हरचना आखली असून, पुन्हा एक पिंजरा त्या ठिकाणी लावण्यात आला आहे, तर दोन्ही बिबटे ज्या पिंजऱ्यात अडकले तो पिंजरा त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगुर्डे, वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक गोरख गांगुर्डे, उस्मान सय्यद, अनिल दळवी, उत्तम बागुल, माया म्हस्के, सुरेखा खजे, रेखा चौधरी, श्रावण कामडी, अण्णा टेकमाळ आदी लक्ष ठेवून आहेत. परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकरी राजेंद्र तिडके, रामकृष्ण मौले, संतोष तिडके, किरण खोडे, वैभव भार्गवे, दत्तात्रेय खोडे, विलास पाटील आदींनी केली आहे, तर पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी परिसरात भेट देत नागरिकांनी संपर्कात राहण्याचे आवाहन केले.

 

Web Title: Two leopards in a cage at Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.