शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:05 IST

जेलरोड येथे मुलीच्या लग्नात संपूर्ण कुटुंब मग्न असल्याची संधी शोधून अज्ञात चोरट्याने जेलरोड पंचक येथे घरफोडी करून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

नाशिकरोड : जेलरोड येथे मुलीच्या लग्नात संपूर्ण कुटुंब मग्न असल्याची संधी शोधून अज्ञात चोरट्याने जेलरोड पंचक येथे घरफोडी करून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तर दुसऱ्या घरफोडीत दोन लाखांचे दागिने असा एकूण दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.जेलरोड पंचक जागृतीनगरमधील दीपलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे स्वर्गीय गणेश धात्रक शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय फकिरा धात्रक यांच्या मुलीचे गोरज मुहूर्तावर लग्न होते. त्यामुळे धात्रक कुटुंबीय लग्नाच्या धावपळीत व्यस्त होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने रविवारी सायंकाळी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात अडकविलेल्या कोटमधून लॉकरची चावी काढून लॉकर उघडले. त्यातून सोन्याचे एक तोळा वजनाचे प्रत्येकी पाच वेढे, पाच तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या चेन, अंगठ्या, डोरले, ठुशी व २१ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन लाखांची घरफोडीजेलरोड लोखंडे मळा पुष्पकनगर येथील दुर्गा निवास येथे राहणारे चंद्रकांत सुभान शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घराला कुलूप लावून सहकुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते घरी परत आले असता त्यांना फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला आढळून आला. दरम्यानच्या काळात चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, चेन, अंगठी, सोन्याची नथ, मुलीचे कानातील टॉप्स, मंगळसूत्र असे एकूण १० तोळे वजनाचे २ लाख २ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

टॅग्स :theftचोरीNashikनाशिकPoliceपोलिस