शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वडाळागाव परिसरात दररोज दोन लाख लिटर पाण्याची चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:00 AM

नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख  लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा पाणी चोरांनी उचलला आहे.

इंदिरानगर : नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख  लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा पाणी चोरांनी उचलला आहे.वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता त्याची जागा आता घरांनी घेतली असून, परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ९० टक्के नागरिकांनी जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी केली आहे. तर जवळपास दोन हजार घरांमध्ये अनधिकृत जोडणी करून घेतली आहे. अनधिकृतपणे नळजोडणीतून महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जात आहे.नाशिक शहरात अशाप्रकारे अनधिकृत नळजोडणीतून सुमारे साडेचार लाख लिटर पाण्याची चोरी होत असताना एकट्या वडाळागावात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दोन लाख लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. एवढ्यावरच या भागातील पाणीप्रश्न भागत नसून, अपुºया पाण्याची ओरड करून या भागात टॅँकरद्वारेदेखील पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अनधिकृत नळजोडणी तोडण्यास असमर्थ असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी