पावणे दोन लाखांच्या घरफोडीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:20+5:302021-07-09T04:11:20+5:30

राजीवनगर येथील सुमन पेट्रोल पंपमागील डेअरी पॉवर लिमिटेड ऑफिसच्या पाठीमागील पत्रा कापून १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल ...

Two lakh burglary charges against Pawne | पावणे दोन लाखांच्या घरफोडीचा छडा

पावणे दोन लाखांच्या घरफोडीचा छडा

राजीवनगर येथील सुमन पेट्रोल पंपमागील डेअरी पॉवर लिमिटेड ऑफिसच्या पाठीमागील पत्रा कापून १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती.

रविवार (दि. ३) रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान ऑफिसच्या पाठीमागील पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून टेबल ड्रावर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाची ३६ तुपाचे डबे सुमारे ६ हजार ६२० रुपये किमतीचे असा १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती.

गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर पवार व दत्तात्रय गवारे यांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौरब माळी, महेश जाधव, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, यांनी सापळा रचून संशयित आरोपी अफरोज चौधरी (२१ पडीत नगर चौक सिडको ), कुलदीप पंडित (१९ पाथर्डी गाव ) यांना अटक करून यांच्याकडून कात्री, १२ तुपाचे डबे आणि रोख ७० हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Web Title: Two lakh burglary charges against Pawne