अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:10 IST2020-01-13T14:10:33+5:302020-01-13T14:10:42+5:30
सिन्नर : पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील मुसळगाव एमआडीसी जवळील केला कंपनीजवळ घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिन्नर : पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाल्याची घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील मुसळगाव एमआडीसी जवळील केला कंपनीजवळ घडली. शुक्र वारी (दि.१०) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात धोंडीराम नामदेव वाघ (३३) रा. धामणगाव ता. इगतपुरी हा दुचाकीस्वार ठार झाला. तर पाठीमागे बसलेला सुरेश सखाराम वाघ (५५) हे गंभीर जखमी झाले. धोंडीराम वाघ व सुरेश वाघ हे दोघेजण शुक्र वारी दुचाकीवरु न जाताना हा अपघात झाला होता. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.