मेशी येथे दुचाकी अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:53 IST2020-03-12T23:52:37+5:302020-03-12T23:53:04+5:30
देवळा : तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महालपाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकींचे दोन्ही चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मेशी येथे दुचाकी अपघातात दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महालपाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकींचे दोन्ही चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गुरूवारी (दि.१२) दहीवड येथील पानसरे कुटुंबीयांनी नियोजित केलेला विवाह समारंभ अमरावतीपाडा (ता. सटाणा) येथे होणार होता. त्यासाठी दहीवड येथील जनार्दन अर्जुन देवरे (४५) हे पत्नी उज्ज्वलासह दुचाकीने (एमएच १५, एपी ४०९६) गेले होते.
रण्यादेवपाडा येथील गुलाब राजाराम सोनवणे (४०) हे पत्नी सरला (३५), मुलगा किरण (१२), व भाचा कार्तिक नीलेश पवार (४) यांच्यासह दुचाकीने मेशी येथे आले होते.
गावाकडून परतताना मेशीजवळ देवरे व सोनवणे यांच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. अपघाताच्या या घटनेत जनार्दन देवरे व गुलाब सोनवणे जागीच ठार झाले, तर उज्ज्वला देवरे, सरला सोनवणे, कार्तिक पवार व किरण सोनवणे हे जखमी झाले.