सटाणा-मालेगाव रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 14:14 IST2018-01-30T14:14:16+5:302018-01-30T14:14:29+5:30
सटाणा : सटाणा - मालेगाव रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. मालट्रकने दुचाकीला जबर ठोस दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले.

सटाणा-मालेगाव रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दोन ठार
सटाणा : सटाणा - मालेगाव रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. मालट्रकने दुचाकीला जबर ठोस दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लखमापूर नजीकच्या चिंचावड फाट्यावर झाला. बागलाण तालुक्यात विहिरींवर काम करणारे राजस्थानी मजूर भालचंद्र मिश्री गुर्जर (३७,चेनपुरिया ता.हुरडा जि.भिलवाडा) आणि गजराज लादू जाट (३९, रा.बोरखेडा ता.हुरडा जि.भिलवाडा) हे दोघे रात्री उशिरा दुचाकीवरून मालेगावहून सटाण्याकडे येत होते.ते चिंचावड फाट्याजवळ आले असता त्यांना भरधाव ट्रकने (एम एच १५ बी १३०५) धडक दिल्याने भालचंद्र गुर्जरचा जागीच मृत्यू झाला.तर गजराज जाट हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी मालेगाव येथे नेत असताना उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी ट्रकचालकासह ट्रक ताब्यात घेऊन अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.