पिंपळगाव बसवंत : येथील निफाड रोडवरील रानमळा येथे मोटरसायकलला अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरूण जागीच ठार झाले आहेत. कुंभारी धारणगाव येथील सागर सिताराम सुरे (२४)व अमोल गजानन सोनवणे (१९) हे मोटरसायकलवरून (क्र . एमएच १७ बीएच २२२५) य् वणी गडावर जात असताना रात्री ९.५० च्या सुमारास अज्ञान वाहनाने धडक दिल्याने दोघेही जागेवरच ठार झाले. वाहनचालक फरार झाला आहे. सदर अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निफाड रस्त्यावर अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:28 IST