पांढुर्लीजवळ मजुरांचा टेम्पो उलटून दोन ठार; २६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:49 AM2020-06-29T00:49:03+5:302020-06-29T00:51:17+5:30

मका सोंगणीसाठी मजूर घेऊन जाणारा टेम्पो सिन्नर - घोटी-सिन्नर महामार्गावर पांढुर्ली जवळील वळणा रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर व २६ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

Two killed in overturning of laborers near Pandhurli; 26 injured | पांढुर्लीजवळ मजुरांचा टेम्पो उलटून दोन ठार; २६ जखमी

पांढुर्लीजवळ मजुरांचा टेम्पो उलटून दोन ठार; २६ जखमी

Next

सिन्नर : मका सोंगणीसाठी मजूर घेऊन जाणारा टेम्पो सिन्नर - घोटी-सिन्नर महामार्गावर पांढुर्ली जवळील वळणा रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर व २६ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
अजय मोतीराम वाघ (२०) रा. निनावी, ता. इगतपुरी व श्रावण सोमा मधे (२४) रा. गीरेवाडी, पिंपळगाव घाडगा, ता.इगतपुरी अशी मृतांची नावे आहेत.
इगतपुरी तालुक्यातील निनावी व पिंपळगाव घाडगा येथून सुमारे ३१ मजूर टेम्पोने (क्रं.एम.एच.१५, सी.के. ३५१०) पांढुर्ली येथे मका सोंगणीसाठी जात होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पांढुर्ली जवळील वाजे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वळण रस्त्यावर चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले व टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला.
जखमी रुग्णालयात
या भीषण अपघातात अजय मोतीराम वाघ व श्रावण सोमा मधे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरु केले. गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. पांढुर्ली दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उदय पाठक, श्रीकांत गारूंगे, नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील पुढील तपास करत आहेत.

Web Title: Two killed in overturning of laborers near Pandhurli; 26 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.