मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:03 IST2020-05-29T22:51:11+5:302020-05-30T00:03:57+5:30
मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात दोन ठार
वाडीवºहे : मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई येथून तिघे जण जळगाव येथे कामानिमित्त कारने (एमएच ०४ एचएफ १९१७) जात होते. नाशिक - मुंबई महामार्गावरील विल्होळी-जवळील आठवा मैल परिसरात रात्रीच्या सुमारास ट्रक (एमएच १५ जीयू ९२२) रस्ता ओलांडत असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. त्यात कारमधील अभिषेक दत्ता बरदाडे (२६), प्रकाश साहू (५२) आणि पराग महादू वाळके (२७) सर्व रा. मुंबई हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले.
मात्र, उपचारादरम्यान अभिषेक बरदाडे आणि चालक प्रकाश साहू हे मयत झाले तर पराग वाळके यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात इतका भयंकर होता की चक्काचूर झालेल्या वाहनात अडकलेल्या चालकाला क्रेन लावून काढण्यात आले. याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार विश्वास देशमुख करत आहेत.