वांजूळपाड्यात दोघांची मनोरुग्णाकडून हत्या घबराट : मनोरुग्णही घसरूण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST2018-04-08T00:36:01+5:302018-04-08T00:36:01+5:30

सुरगाणा : तालुक्यातील वांजूळपाडा येथे एका व्यक्तीने दोन जणांची निघृण हत्या केल्यानंतर त्या त्याचाही मृत्यू झाला आहे.

Two killed in Manavurgaon accident | वांजूळपाड्यात दोघांची मनोरुग्णाकडून हत्या घबराट : मनोरुग्णही घसरूण ठार

वांजूळपाड्यात दोघांची मनोरुग्णाकडून हत्या घबराट : मनोरुग्णही घसरूण ठार

ठळक मुद्देभास्कर तोच दांडा घेऊन पळत सुटलागावात तणाव असल्याने दंगा नियंत्रण पथकाचा बंदोबस्त

सुरगाणा : तालुक्यातील वांजूळपाडा येथे एका व्यक्तीने दोन जणांची निघृण हत्या केल्यानंतर त्या त्याचाही मृत्यू झाला आहे. गावातील मनोरुग्ण भास्कर मोहन जोपळे (२५) याने लाकडी दांड्याने गुलाब पालवी यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भास्कर तोच दांडा घेऊन पळत सुटला. त्यावेळी त्या बाजूला शेतामध्ये राहीबाई चिंतामण बागुल (६५) या गहू कापत होत्या. त्यांच्यावर भास्करने हल्ला केला. त्यात त्या ठार झाल्या. त्यानंतर हल्लेखोर भास्कर पुन्हा दगड खडकातून पळत सुटला. पळताना त्याला ठेच लागून तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यास उपचारासाठी पाठविले असता तोही मयत झाला. येथील धर्मा झिमण पवार यांनी फिर्याद दिली. या मारहाणीत फिर्यादीचा गुलाब पालवी जावई आहे. यामुळे गावात तणाव असल्याने दंगा नियंत्रण पथकाचा बंदोबस्त आहे. आमदार जे.पी. गावित यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन याबाबत कुटुंबीयांशी भेट घेऊन विचारपूस केली, तर पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील येथे तळ ठोकून होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सविस्तर तपास करीत आहेत.
कुºहाडीने मारहाण
आरोपी भास्कर जोपळे याने
शुक्र वारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी पवार यांचा जावई गुलाब गोपाळ पालवी (२६) यांना कुºहाडीने मारहाण केली. त्यामुळे गुलाब यांनीही लाकडी दांडक्याने आरोपीला मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले.

Web Title: Two killed in Manavurgaon accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून