नाशिक जिल्ह्यात वंजार वाडीत घर कोसळून दोन ठार

By संजय पाठक | Updated: September 9, 2022 10:59 IST2022-09-09T10:59:07+5:302022-09-09T10:59:25+5:30

जिल्ह्यातील काही भागात काल तीन तासांत अतिवृष्टी झाली. यात नाशिक जवळ वंजारवाडी येथे मध्यरात्री घर कोसळून दोन जण ठार झाले.

Two killed in house collapse in Vanjar wadi in Nashik district | नाशिक जिल्ह्यात वंजार वाडीत घर कोसळून दोन ठार

नाशिक जिल्ह्यात वंजार वाडीत घर कोसळून दोन ठार

नाशिक- 

जिल्ह्यातील काही भागात काल तीन तासांत अतिवृष्टी झाली. यात नाशिक जवळ वंजारवाडी येथे मध्यरात्री घर कोसळून दोन जण ठार झाले.

छबु सीताराम गवारी आणि त्याची पत्नी मंदाबाई गवारी हे दोघे जण या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. पावसामुळे घराचा पाया कमकुवत होऊन घर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. काल सायंकाळी साडे पाच वाजेनंतर नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर आणि सिन्नरला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने नाशिक शहरातही रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाचा विद्युत प्रवाह पाण्यात गेल्याने बबलू बाखील खान या युवकाचा मृत्यु झाला होता त्यामुळे कालच्या पावसाने तीन जणांचा बळी घेतला आहे.

Web Title: Two killed in house collapse in Vanjar wadi in Nashik district