Two killed in heavy crash | भीषण अपघातात दोन ठार

भीषण अपघातात दोन ठार

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबत नाही. दररोज कुठे ना कुठे भिषण किंवा किरकोळ अपघात होतांना दिसतच आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी नऊ वाचेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळील महामार्गावरील हॉटेल परिवार गार्डन समोरच मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कार क्र . आरजे १९, टीए ८००५ ने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की या कारमधील एका महिलेचे शिरच ( मुंडके ) धडावेगळे होऊन कारच्या मागील बाजूस डिक्कीच्या काचेला अडकुन पडले . या वरु न अंदाज येतो की या कारचा वेग किती असेल परंतु या अपघातात कारचालकाला डुलकी आल्याने त्याचा कार वरील नियंत्रण सुटल्याने कार सरळ गॅस टँकरला पाठी मागुन धडकली. हा अपघात इतका भयानक झाला की कारचा पुर्ण चक्काचुर झाला आहे. पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Two killed in heavy crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.