शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुगारवाडी धबधब्याच्या डोहात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:45 IST

त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी तेलंगणातील असून, शिक्षणासाठी औरंगाबादला वास्तव्यास होते. गिरिधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०), अनुषा (२१), रघुवंशी (२१), कोटी रेड्डी (२०) आणि काव्या एल (२०, रा. हैदराबाद) हे विद्यार्थी नाशिक येथे आले होते. मंगळवारी (दि.१७) ते दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी सायंकाळी गेले. त्यांनी त्यांच्या दुचाकी वनविभागाच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केल्या. यातील तिघांनी धबधब्याच्या तळाकडे जाण्याचा मानस व्यक्त केला. मात्र गिरिधर, व्यंकटेश आणि काव्या या तिघांनी वरच थांबणे पसंत करत तुम्ही दरीकडे जाऊ नका, असा सल्लाही तिघांना दिला.सायंकाळ होत आल्याने अन्य विद्यार्थी ठरल्याप्रमाणे नाशिक येथे सुला वाईनला मुक्कामी राहिले. मात्र मित्र अजूनही आले नाहीत, त्यांचा मोबाईल लागत नाही म्हणून रात्री ९ वाजेच्या सुमारास काही मित्र पुन्हा तळेगाव येथे पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी धबधब्याच्या जवळ जाऊन शोध घेतला असता रस्त्यात चप्पल, तसेच धबधब्या जवळ घड्याळ आणि दोन मोबाइल आढळून आले. शिवाय अनुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. प्रशासनाने पोलिसांसह घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.वैनतेय गिर्यारोहण ग्ाििरभ्रमण संस्थेचे दयानंद कोळी, संतोष कुलकर्णी, भाऊसाहेब कानमहाले, रमेश वझे, चेतन खर्डे, रोहित हिवाळे आदींचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनुषाचा मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. उशिरा एका विद्यार्थ्याचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले. मात्र, एकजण अद्यापही बेपत्ता असून, अंधारात अडथळे येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.‘सेल्फी’चा संशयमयत अनुषाला सेल्फीची खूप आवड होती. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तिनेच आग्रह धरला असावा. त्यामुळे धबधब्याच्या जवळ दगडावर उभे राहून सेल्फी घेत असताना पाय घसरला असावा आणि तिला वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करताना तेही पाण्यात बुडाले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय