बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:11 IST2020-02-07T21:36:57+5:302020-02-08T00:11:40+5:30
चांदवड तालुक्यातील देणेवाडी शिवारात बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला.

बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
चांदवड : तालुक्यातील देणेवाडी शिवारात बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मंगरूळ- देवळा रोडवर सुरत-मनमाड बस क्र मांक एमएच २०, बीएल ३६६८ हिने मंगरूळकडून जाणारी मोटरसायकल क्रमांक एमएच १५, बी पी ३८९२ हिला धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार अरबाज निसार खान १८ राहणार देणेवाडी हा गादी भरण्याचा व्यवसाय करणारा तरुण ठार झाला. तर मोटारसायकलवरील सैबाज निसार खान (१६) हा किरकोळ जखमी झाला. मृत अरबान याचा मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला. सैबाज याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.