अपघातात दोन ठार
By Admin | Updated: March 29, 2017 00:13 IST2017-03-29T00:12:55+5:302017-03-29T00:13:11+5:30
आझादनगर : मुंबई-आग्रा महामार्गावर तालुक्यातील सौंदाणे शिवारात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार, तर तीनजण जखमी झाले.

अपघातात दोन ठार
आझादनगर : मुंबई-आग्रा महामार्गावर तालुक्यातील सौंदाणे शिवारात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार, तर तीनजण जखमी झाले. मृतात मालेगाव महापालिकेचे लेखाधिकारी कमरूद्दीन शेख यांचे बंधू मनपा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी रियाजुद्दीन शेख यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. शेख रियाजुद्दीन शेख समसुद्दीन (४६), रा. वृंदावनचौक हे दोघा बहिणींसह मुंबई येथे वैद्यकीय तपासणी करून घरी परतताना सौंदाणे शिवारातील हॉटेल फाउंटनजवळ त्यांची कार ट्रॅक्टरवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात शेख रियाजुद्दीन समसुद्दीन व कारचालक फक्रुद्दीन सद्रोद्दीन, रा. नयापुरा हे दोघे गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील इतर जखमींना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. (वार्ताहर)