सावळघाटात साखरेचा ट्रक उलटून दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:14 IST2021-05-21T15:14:10+5:302021-05-21T15:14:25+5:30
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर सावळघाटात साखर वाहून नेणारा ट्रक उलटा झाल्याने चालक व वाहक जखमी झाल्याची घटना घडली.

सावळघाटात साखरेचा ट्रक उलटून दोघे जखमी
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर सावळघाटात साखर वाहून नेणारा ट्रक उलटा झाल्याने चालक व वाहक जखमी झाल्याची घटना घडली. बार्शी येथून साखर भरून गुजरातकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच-12-एलटी- ५५२६ बुधवारी सावळघाटातील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला खोलगट जागेवर पलटी झाला. यामध्ये ट्रकचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून साखरेचे पोते इतस्ततः फेकले गेले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसून चालक व क्लीनर जखमी झाले आहेत. याबाबत दिंडोरी पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.