सव्वा लाखाचा मुद्देमाल दोन घरफ ोड्यांमध्ये लंपासं

By Admin | Updated: August 6, 2014 00:36 IST2014-08-05T23:54:02+5:302014-08-06T00:36:06+5:30

सव्वा लाखाचा मुद्देमाल दोन घरफ ोड्यांमध्ये लंपासं

The two houses will be set up in two houses | सव्वा लाखाचा मुद्देमाल दोन घरफ ोड्यांमध्ये लंपासं

सव्वा लाखाचा मुद्देमाल दोन घरफ ोड्यांमध्ये लंपासं

 

नाशिक : गंगापूररोड परिसरात दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यात फि र्याद देण्यात आली आहे़
गंगापूर कॉलनीतील मयुरी अपार्टमेंटमध्ये राहणारे रणजित श्यामसिंग परदेशी (२३) हे कामानिमित्त बाहेर गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील चार तोळे वजनाचे सोन्याचे दोन कंगण, मोबाइल असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घरफ ोडी गंगापूर रोडवरील आशादीप इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात झाली़ रात्रीच्या सुमारास बंद असलेल्या या दुकानाचे शटर उचकटून ३२ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम व सोनी कंपनीचे चार कॅमेरे असा एकूण ५८ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ओमप्रकाश श्यामालाल शदीजा (३५, रा़ आशादीप बंगला, तिडके कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The two houses will be set up in two houses