शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पांडवलेणीवर अडकलेल्या दोघा युवकांना पोलीस, अग्निशमन दलाने केले रेस्क्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:39 IST

उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातारणात धमाल करायची म्हणून भाभानगर परिसरातील चार मित्र सकाळी लेणी परिसरात आले. जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावर अडकून पडलेल्या दोघा हौशी तरूणांना सुखरूप खाली उतरविले.

ठळक मुद्देपोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती

नाशिक :पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा आहे; मात्र लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विना परवानगी प्रवेश करून डोंगर सर करण्यास भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा आहे, तरीदेखील दोन तरूण मंगळवारी (दि.२८) पुन्हा डोंगर सर करण्याचा प्रयत्नात माथ्यावर पोहचले आणि तेथून पुन्हा खाली येताना डोळे गरगरू लागल्याने आत्मविश्वास ढासळला व आपण सुखरूप खाली उतरून येऊ शकत नसल्याचे त्यांनी डोंगरपायथ्याला असलेल्या अन्य मित्रांना कळविले. त्यानंतर मित्रांनी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलाशी संपर्क साधून आपत्कालीन मदत मागितली. जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावर अडकून पडलेल्या दोघा हौशी तरूणांना सुखरूप खाली उतरविले.उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातारणात धमाल करायची म्हणून भाभानगर परिसरातील चार मित्र सकाळी लेणी परिसरात आले. लेणी बघितल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा म्हणून निलय कुलकर्णी, गर्व सावलाणी,वंश पंजाबी, मीत कुकरेजा (रा. भाभानगर) या चौघा युवकांनी डोंगर सर करण्यास सुरु वात केली. निलय, गर्व हे दोघे डोंगराच्या माथ्यावर पोहचले तर वंश, मीत हे डोंगराच्या पायथ्यापासून काही उंचीवर असल्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनी धाव घेऊन या दोघांना सुखरूप खाली उतरविले; मात्र डोंगरमाथ्यावर पोहचलेल्या दोघांना उंचीवरून चक्कर येऊ लागल्याने त्यांचे पुन्हा खाली उतरून येण्याचे धाडस झाले नाही. दोघा मित्रांनी येथील नागरिकांना हा प्रकार सांगितला तेव्हा नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत मागितली. काही वेळेतच जलद प्रतिसाद पथकाचे कमांडो, सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान आवश्यक साधनसामुग्री घेऊन पांडवलेणी डोंगरावर पोहचले अन् बचावकार्य सुरू केले. जवानांनी दोरखंड घेऊन डोंगरमाथा गाठला. अडकलेल्या दोघा मित्रांन दोरखंडाच्या सहाय्याने लेणीजवळ सुखरूप उतरविले.‘त्या’ घटनेची पुनरावृत्तीरविवारी अशाच पध्दतीने अशोकामार्गावरील रहिवासी दाम्पत्य पांडवलेणी डोंगरावर दीड तास अडकून पडले होते. त्यांनाही अशाच पध्दतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू के ले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा मंगळवारी दोघे युवक अडकल्याची घटना घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पालकांनी सकाळच्या सुमारास भटकंती करण्यासाठी जाणाऱ्या आपल्या मुलांना याबाबत बजावणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे. वनविकास महामंडळाने राखीव वनक्षेत्रात प्रवेशास मनाई असल्याचे सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलPoliceपोलिसPandav cavesपांडवलेणीTrekkingट्रेकिंग