नाशिक शहरातील दोन अभियंत्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:51 AM2019-03-21T00:51:53+5:302019-03-21T00:52:38+5:30

ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२०) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Two engineers suicides in Nashik city | नाशिक शहरातील दोन अभियंत्यांची आत्महत्या

नाशिक शहरातील दोन अभियंत्यांची आत्महत्या

googlenewsNext

नाशिक : ऐन होळी सणाच्या दिवशी शहरातील म्हसरूळ व सिडको परिसरात दोन अभियंत्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२०) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तरुण अभियंत्याने गळफास घेतला, तर म्हसरूळ येथे सीडीओ मेरी कार्यालयातील अभियंत्याने आजारपणाला कंटाळून गळफास घेत जीवनयात्रा संपविली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सीडीओ मेरी कार्यालयात अभियंता म्हणून नोकरीस असलेले शिवाजी केरु प्पा चौघुले (५७) यांनी म्हसरूळ येथे राहत्या घरी आजारपणाला कंटाळून गळफास घेतला. चौघुले यांनी आत्महत्येपूर्वी आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. निसर्गनगर म्हसरूळ येथील रहिवासी चौघुले हे मेरी येथे अभियंता म्हणून नोकरीला होते.
इमारतीवरून कोसळून इसम ठार
इंदिरानगर परिसरातील विश्वा हाईट्स या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर राहणारे कांतीभाई कालुभाई जिगाणे (४०) हे राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून अचानकपणे गुरुवारच्या सकाळी कोसळले. यामुळे जिगाणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार त्यांचे बंधू कपील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. राहुल मोदगी यांनी घोषित केले.

Web Title: Two engineers suicides in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.