कुंदलगावजवळ दोन साईभक्त ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:24 IST2018-03-03T00:23:46+5:302018-03-03T00:24:29+5:30
मनमाड - मालेगाव रोडवर तालुक्यातील कुंदलगाव शिवारात शुक्रवारी (दि. २) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारचे अचानक टायर फुटल्याने कार पलटी होऊन दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

कुंदलगावजवळ दोन साईभक्त ठार
चांदवड : मनमाड - मालेगाव रोडवर तालुक्यातील कुंदलगाव शिवारात शुक्रवारी (दि. २) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारचे अचानक टायर फुटल्याने कार पलटी होऊन दोन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. खाम- गाव येथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे मारुती सेलोरो कारचे (क्र. एमएच २८ एएन ४७५१) पुढील टायर फुट-ल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात हर्षद राजकुमार खान चंदाणी (२२) व विशाल पवनकुमार लेखवाणी (२२) (दोघे रा. खामगाव, जि. बुलढाणा) जागीच ठार झाले, तर कारचालक लखन मनोहर पेशवानी (२३), सनी दीपक पेशवानी (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात
आले. अपघाताचे वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, हवालदार नरेंद्र सौंदाणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करीत आहेत.
काळाचा घाला
मारुती सेलोरो कारमधील हे सर्व प्रवासी खामगाव येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनास जात असताना काळाने घाला घातला आहे जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले दाखल करण्यात आले आहे.