शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

लाचखोर कृषी उपसंचालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:33 IST

नाशिक : द्राक्ष निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार आघाव याला बुधवारी (दि.४) जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देझाडाझडती : दोन लाखांच्या रोकडसह आढळले दागिने

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : द्राक्ष निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार आघाव याला बुधवारी (दि.४) जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आघावच्या घरी केलेल्या झडतीत दोन लाखांची रोकड, सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, जमीन खरेदीची कागदपत्रे, बँक आणि डिमॅट खात्याची पुस्तके सापडली असून, सर्व संपत्तीचा हिशेब करण्यास वेळ लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.आघाव यास मंगळवारी (दि.३) दुपारी त्याच्याच कार्यालयात लाच घेताना अटक करण्यात आली होती. कृषी मालाच्या निर्यातीसाठी लागणारे परवाने मिळवून देण्याचे काम जे अ‍ॅण्ड जे एक्स्पोर्ट या फर्मच्या कर्मचाऱ्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. कृषिमालाच्या निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्रासाठी कृषी विभागात या कंपनीने अर्ज दाखल केला होता. मात्र, यापूर्वी दिलेल्या फायटो प्रमाणपत्रासाठी आघाव याने प्रत्येक प्रमाणपत्रासाठी पाचशे रु पये यानुसार एक लाख ६४ हजार रु पयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पहिल्यांदा एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शविली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.३) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना आघाव यास रंगेहाथ पकडले.आघावला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने त्याची बेहिशेबी मालमत्ता शोधण्यासाठी आघावच्या गोविंदनगर भागात असलेल्या आलिशान बंगल्यात झडतीसत्र राबविले. यावेळी त्याच्या घरात दोन लाख रुपयांची रोकड, सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने, जमिनी खरेदीच्या व्यवहारांची कागदपत्रे सापडली. आणखी मिळकत सापडण्याची शक्यताआघावसह कुटुंबीयांची पाच-सहा बँका आणि डिमॅट खात्याची पुस्तके मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे पाल्यासाठी शैक्षणिक कर्जही काढल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत उघड झाले आहे. अर्थात, चौकशीत आणखी मिळकत सापडण्याची शक्यता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग