टू-डी अ‍ॅनिमेशनची परीक्षा ६ सप्टेंबरला

By Admin | Updated: August 7, 2014 01:30 IST2014-08-07T01:24:00+5:302014-08-07T01:30:15+5:30

टू-डी अ‍ॅनिमेशनची परीक्षा ६ सप्टेंबरला

The two-day animation test will be held on September 6 | टू-डी अ‍ॅनिमेशनची परीक्षा ६ सप्टेंबरला

टू-डी अ‍ॅनिमेशनची परीक्षा ६ सप्टेंबरला

 नाशिक : ‘डिप्लोमा इन टू-डी अ‍ॅनिमेशन’ या अभ्यासक्रमातील गैरव्यवहार प्रकरणी स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, अहवालातील निर्णयानुसार ६ सप्टेंबर २०१४ रोजी सदर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
नाशिक विभागीय केंद्राअंतर्गत २०१३-१४ साठी ‘डिप्लोमा इन टू-डी अ‍ॅनिमेशन’ हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाकरिता तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मात्र प्रवेश अर्जांची तपासणी करताना चलनांमध्ये प्रचंड त्रुटी असल्याने, विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले की नाही, अशी साशंकता वर्तविणारे पत्र विभागीय संचालकाने विद्यापीठास पाठविले होते. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाच्या तिजोरीत जमाच झाले नसल्याचा संशय असल्याने विद्यापीठाकडून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने या प्रकरणी संपूर्ण तपास करून, त्याबाबतचा अहवाल नुकताच विद्यापीठास सादर केला आहे.
अहवालानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा त्वरित घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच अभ्यास केंद्रचालकांना परीक्षेचे नियोजन व वेळापत्रक पाठविण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The two-day animation test will be held on September 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.