लॉकडाऊनमध्ये दोन कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 09:40 PM2020-07-29T21:40:43+5:302020-07-30T01:52:28+5:30

मालेगाव : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाले असताना शासनाकडून आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक उद्योग, कारखाने यंत्रमाग सुरू करण्यात आले. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दोन कोटी २५ लाख रुपये महसुली उत्पन्न मिळविले आहे.

Two crore revenue in lockdown | लॉकडाऊनमध्ये दोन कोटींचा महसूल

लॉकडाऊनमध्ये दोन कोटींचा महसूल

Next
ठळक मुद्देमालेगाव उपप्रादेशिक विभाग : अत्यावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी ई-पासची सुविधा

शफीक शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाले असताना शासनाकडून आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक उद्योग, कारखाने यंत्रमाग सुरू करण्यात आले. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दोन कोटी २५ लाख रुपये महसुली उत्पन्न मिळविले आहे.
या काळात शहरातील सर्वच व्यवसाय, शासकीय कामकाज बंद असताना उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे अत्यावश्यक सेवा दिल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली. साधारणपणे लॉकडाऊनचे तीन महिने नागरिकांसाठी अत्यंत हलाखीचे गेले. या काळात शासनाच्या आदेशानुसार काही कर्मचारी कार्यालयात हजेरी लावून कामकाज पार पाडत होते.
लॉकडाऊन काळात वाहने बंद होती. मात्र नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा आणि जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात होत्या. त्यासाठी काही वाहनांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता, तर आरोग्यविषयक शस्रक्रिया करण्यासाठी मुंबई, नाशिकसह तज्ज्ञ डॉक्टरांकडे नागरिकांना उपचार घेण्यासाठी जावे लागत होते. अशा वाहनांना शासनातर्फे ई-पास देण्यात आले होते. मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुमारे २ हजार १८५ वाहनांना अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्याकरिता ई-पास उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांना कोणतीही अडचण भासली नाही. गॅस, दूध, भाजीपाला, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू लॉकडाऊन काळात मिळू शकल्या.
वायुवेग पथकाद्वारे शहरातील अवैध वाहतुकीविरोधात कारवाई सुरूहोती. लॉकडाऊन काळात आपल्या राज्यातून इतर राज्यात अनेकमजुरांचे स्थलांतर सुरू होते. तर काही मजूर राज्यातच आपापल्या घरी पायी जात होते. १६२ ट्रॅक्टर्स, ११२ ट्रेलर, ७ मालवाहू वाहने आणि इतर ६ वाहनांची नोंदणी करण्यात आली. वायुवेग पथकाद्वारे ३५० वाहनांची तपासणी करण्यात आली आणि दोषी आढळलेल्या ६२ वाहनचालकांविरोधात शासकीय कारवाई केली. एकूण ८८७ वाहनांची नोंद, अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्याकरिता ई-पासची सुविधा यात ५३१ दुचाकी, ६९ कार आणि जीपची नोंद आहे़ आरोग्यविषयक नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी वाहनांना शासनातर्फे ई-पास देण्यात आले होते. उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे १ हजार १३६ मजुरांना त्यांच्या गावी जाण्याकरिता ४९ एसटी बसेसची व्यवस्था केली. अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्याकरिता दोन हजार १८५ वाहनांना मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली. शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यात २ कोटी २५ लाख रुपये महसुली उत्पन्न मिळविले आहे.

Web Title: Two crore revenue in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.