नांदगावकरांकडे दोन कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 13:19 IST2019-02-13T13:17:10+5:302019-02-13T13:19:25+5:30
नांदगाव : शहरातील नागरिकांनी विविध करापोटी २ कोटी १४ लाख ७२ हजार ८२६ रूपयांची थकबाकी केली असून त्याविरोधात नांदगाव प्रशासनाने वसुली मोहीम सुरु केली आहे.

नांदगावकरांकडे दोन कोटींची थकबाकी
नांदगाव : शहरातील नागरिकांनी विविध करापोटी २ कोटी १४ लाख ७२ हजार ८२६ रूपयांची थकबाकी केली असून त्याविरोधात नांदगाव प्रशासनाने वसुली मोहीम सुरु केली आहे. पाणीपट्टी व घरपट्टी पोटी ३२ लाख ५२ हजार ५८१ रु पये वसूल करण्यात आले आहेत अशी माहिती नांदगांव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी दिली. कर वसुलीसाठी प्रशासनाने सात कर्मचाºयांची नियुक्ती केली असून घरोघरी जाऊन थकबाकीची नोटीस बजावणे व वसुली करणे असे धोरण आखले आहे. कर न भरणाºया सात नळ धारकांच्या जोडण्या तोडण्यात आल्या असून पट्टी न भरणाºयांवर सक्त कारवाई करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या आहेत, असे देवचके यांनी सांगितले. थकीत पाणी पट्टीची मागील बाकी ५७ लाख ८२ हजार २९० रु पये एवढी आहे . चालु वर्षातील बाकी ५६ लाख ४४ हजार ५६० रु पये एवढी आहे. दोन्ही मिळून १ कोटी १४ लाख २६ हजार ८५० रु पये थकीत पाणी पट्टी आहे.
नेहमीच थकबाकीचे कारण पुढे करून नांदगाव शहराचा पाणीपुरवठा तोड्ण्याची भाषा वापरणार्या जिल्हा परिषदेला मागची सुमारे ८५ लाखांची थकबाकी एकरकमी भरून त्यांच्याकडून नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रशासन गतिशील असते. मात्र कधी कधी जलवाहिन्या फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असतो. नागरिकांनी सर्व प्रकारचे कर वेळेवर भरून प्रशासनाला सहकार्य केल्यास अधिक चांगली सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे देवचके यांनी सांगितले.