नाशिक : बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडल्याने अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़३१) दुपारी आडगाव परिसरात घडली़श्रीरामनगरमधील खंडेराव मंदिराच्या मागे श्री पॅलेस अपार्टमेंटचे काम सुरू आहे़ या ठिकाणी मारुती टाकळे हे कामास असून, त्यांना रितेश नावाचा अडीच वर्षांचा मुलगा आहे़ मारुती टाकळे हे शुक्रवारी दुपारी श्रीरामनगरमधील अमोल राजाराम पाटील यांच्या घरी गेले होते़ तेथेच त्यांचा मुलगा रितेश हा बाहेर खेळत होता़ खेळता-खेळता तो बांधकाम साईटवरील पाण्याच्या टाकीत पडला़ रितेश यास टाकळे यांनी तातडीने टाकीबाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)
अडीच वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: August 1, 2015 23:11 IST