टाकेदला वाहन जाळणाऱ्या दोन फरार संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:27+5:302021-06-26T04:11:27+5:30
टाकेद येथील प्रेमनगरमध्ये विष्णू रामभाऊ पवार यांना ग्रामपंचायतने घरकूल मंजूर केले होते. परंतु, मंजूर केलेल्या जागेवर घरकूल न बांधता ...

टाकेदला वाहन जाळणाऱ्या दोन फरार संशयितांना अटक
टाकेद येथील प्रेमनगरमध्ये विष्णू रामभाऊ पवार यांना ग्रामपंचायतने घरकूल मंजूर केले होते. परंतु, मंजूर केलेल्या जागेवर घरकूल न बांधता ते वहिवाटीला अडथळा ठरेल, असे बांधल्याने रहिवाशांचे वाद झाले. याबाबतची लेखी तक्रार अनिता गायकवाड, शांतीबाई (गीता) गायकवाड व संगीता गायकवाड यांनी दिली होती. त्याचा राग येऊन दि. ५ मे रोजी पहाटेच्या सुमारास संशयितांनी राजेंद्र गायकवाड यांची नवीन आय २० ही गाडी जाळली होती. त्यानंतर संशयित बाप-बेटे फरार झाले होते. याप्रकरणी गायकवाड यांनी घोटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गणेश विष्णू पवार व संपत विष्णू पवार यांना अटक केली होती तर शिवराम रामभाऊ पवार व नारायण शिवराम पवार हे पोलिसांना हुलकावण्या देत होते. अखेर सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांनी दोहाेंच्या मुसक्या आवळत जेरबंद केले.
इन्फो
दीड महिन्यांपासून हुलकावणी
घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, काॅन्स्टेबल बस्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनीही धडक कारवाई केली. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अकोला तालुक्यातील धामणगाव पाट, माणिक ओझर, बाभूळवाडी, कोहंडी येथे दीड महिन्यांपासून लपून बसलेल्या या दोन संशयितांना पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.