बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 01:23 IST2021-10-29T01:23:06+5:302021-10-29T01:23:45+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) एकूण ७० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, तुलनेत दुप्पटीहून अधिक म्हणजे १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) एकूण ७० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, तुलनेत दुप्पटीहून अधिक म्हणजे १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६७७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तच्या संख्येत दिवसभरात मोठी वाढ झाल्याने उपचारार्थी रुग्णसंख्या ६५१ पर्यंत खाली आली आहे. त्यात ३८९ नाशिक ग्रामीणचे, २३० नाशिक मनपाचे, १० मालेगाव मनपा, तर २२ जिल्हाबाह्य रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालांची संख्या ५१४ वर पोहोचली असून त्यात ३११ नाशिक ग्रामीण, १०६ नाशिक मनपा तर ९७ मालेगाव मनपाचे आहेत.