साडेबावीस लाखांचा सुगंधित मसाल्यासह तंबाकूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:48+5:302021-06-26T04:11:48+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ...

साडेबावीस लाखांचा सुगंधित मसाल्यासह तंबाकूसाठा जप्त
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सायखेडा गावातील रायगड गल्लीत संशयित अर्जुन भादेकर (वय २१) याच्या घरासमोरील गोडावूनवर छापा टाकला असता चार चारचाकी वाहनासह (एम एच १५ एच एच ०९९३) २२ लाख ४३ हजार १९२ रुपये किमतीचा सुगंधित मसाला व तंबाकू यांचा साठा आढळून आला. पथकाने सदर मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राजेंद्र सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक केल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले असल्याची माहिती सायखेडा पोलिसांनी दिली.
फोटो- २५ सायखेडा ॲक्शन
सायखेडा येथे अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला माल.
===Photopath===
250621\25nsk_18_25062021_13.jpg
===Caption===
फोटो- २५ सायखेडा ॲक्शनसायखेडा येथे अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला माल.