सिडको : नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी असतानाही सिडकोतील पवननगर भागात नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून वीस हजार रु पये किमतीचा नायलॉन मांजाचे ३७ गट्टू (रीळ)जप्त केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दुकानदार राजेंद्र कल्याणसिंग देवरे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, पवननगर भागातील गणेश पतंग या दुकानात नायलॉनवर बंदी असून ही विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, यानंतर पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मारुती गायकवाड, अवी देवरे, हेमंत आहेर आदींनी पवननगर भागातील गणेश पतंग या दुकानावर धाड टाकली, यावेळी पोलिसांनी वीस हजार रुपये किमतीचा मांजा जप्त केले. पोलीस शिपाई हेमंत आहेर यांच्या फिर्यादीवरून दुकानदार राजेंद्र देवरे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सिडकोत वीस हजारांचा मांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:21 IST