शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालाचा पेच; अकरावी ‘रेस्ट ईयर’ समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे ...

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. मात्र बारावीचे प्रॅक्टिकल झालेच नाही. बारावीला अंतर्गत गुणही नाहीत. शिवाय अनेक विद्यार्थी अकरावी हे रेस्ट ईयर समजतात. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षेची शाश्वती नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने घेणार, हा प्रश्न पालकांना सतावू लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षेबाबत सध्या तरी खरे दिसत नाही. त्यामुळे आता अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. त्यातही प्रॅक्टिलही झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कसे द्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. यावरून शिक्षकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. बारावीला अंतर्गत गुण नाहीत. अशा स्थितीत बारावीच्या निकालाबाबत शिक्षण विभागाचे नेमके धोरण काय राहील, हे सध्या तरी स्पष्टपणे सांगत नाही. याकडे प्राचार्यांनी लक्ष वेधले, अकरावीला शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी या बर्षाला 'रेस्ट ईयर' समजतात. त्यामुळे भविष्यातील शिक्षणाचे नुकसान होणार, ही धास्ती विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाहीत

कोरोनाच्या धास्तीमुळे शिक्षण विभागाने गतवर्षी अकरावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वांना १२वीत पदोन्नत करण्यात आले. मात्र, अभ्यासातील अडचणी जैसे थे होत्या. अनेक

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कन्सेप्टच टूर झाला नाही. त्यामुळे ज्ञान व माहितीचा पाया कच्चा राहिला. प्रॅक्टिकलही झाल्या नाहीत. अशा स्थितीत विद्यार्थी पदोन्नत झाले, तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी चिंता

पालकांमध्ये कायम आहे.

बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?

बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० गुणांची गणित व इंग्रजी विषयांची तोंडी परीक्षा घेतली जाते. त्याशिवाय २०-२० गुणांची अन्य विषयांचीही चाचणी होते. ही परीक्षा देणाऱ्यांना अंतर्गत गुण मिळतात. कोरोनामुळे वार्षिक व अन्य विषयाच्या तोंडी परीक्षाही घेता आल्या नाहीत. यातून विद्यार्थ्यांची क्षमता चाचणीही करता आली नाही.

पॉइंटर

बारावीतील विद्यार्थी -७५३४३

कला-२९३४७

वाणिज्य-१४९६८

विज्ञान-२८ १८६

---

बारावीसाठी असे होणार गुणदान

बारावीसाठी गुणदान करताना दहावीतील सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ३० टक्के प्रमाणात, अकरावीचे वार्षिक विषयनिहाय गुण ३० टक्के तसेच बारावीतील वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के असे एकूण १०० टक्के गुणांचे गुणदान केले जाणार आहे.

---

अकरावी तर ‘रेस्ट ईयर’

अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्षे हे रेस्ट ईयर समजून अभ्यासाकडे फारसे लक्ष देत नाहीत. या विद्यार्थ्यांचे लक्ष प्रामुख्याने दहावी व बारावीच्या परीक्षांसोबत जेईई , नीट, सीईटीसारख्या प्रवेशपरीक्षांवर केंद्रित असते. ते अकरावी सहजपणे उत्तीर्ण करतात. परंतु, गुणसंपादनाकडे फारसे लक्ष देत नाही. अशा विद्यार्थ्यांचे यावर्षी तीन वर्षांच्या मूल्यांकनामुळे नुकसान होणार आहे.

दहावीला मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

अनेक विद्यार्थ्यांनी दहावीला चांगले गुण मिळतात . परंतु ते अकरावीला थेट बारावीच्या अभ्यासक्रमाची आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अकरावीच्या अभ्यासक्रमावर फारसे लक्ष केंद्रित करीत नाहीत. त्यामुळेे विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण असून अकरावी कमी गुण मिळतात. परंतु, सध्याच्या निकाल पद्धतीत अकरावीचे गुणही गृहीत धरले जाणार असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या गुणवत्तेवर होऊन विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्ष नुकसान होणार असल्याची मत शहरातील विविध महाविद्यालयांतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.

कोट

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता

बारावीची परीक्षा व निकालाचा तिढा कायम आहे. कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीतही तफावत आहे. सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यास प्राचार्यांकडून शिक्षण विभागाचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे यंदा शिक्षणाचे काय होणार, याची चिंता आहे.

- संजय कदम , विद्यार्थी, उपनगर

अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. त्यातही यंदा प्रॅक्टिकल झाले नाही. त्यामुळे गुणदान कसे करणार, याची माहिती अद्याप शाळेकडून मिळाली नाही. याबाबत नोटीस बोर्डवर स्पष्ट माहितीपत्रक लावावे.

- तनुश्री डोंगरे, विद्यार्थिनी, इंदिरानगर