तुलसीमानस रामकथेची सांगता
By Admin | Updated: August 28, 2015 23:44 IST2015-08-28T23:43:40+5:302015-08-28T23:44:35+5:30
कैलासमठ : विविध धार्मिक कार्यक्रम

तुलसीमानस रामकथेची सांगता
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा तसेच श्रावण मासानिमित्ताने पेठरोड येथील कैलासमठात (भक्तिधाम) आयोजित तुलसीमानस रामकथेची शुक्रवारी सांगता झाली.
गेल्या आठवड्यापासून ही रामकथा सुरू करण्यात आली होती. उज्जैन येथील डॉ. सुमनभाई यांनी ही रामकथा भाविकांना सांगितली. नाशिक पुण्यभूमी आहे. सिंहस्थानिमित्ताने नाशिकला पहिल्यांदाच तुलसीमानस रामकथा करायला मिळाली. या रामकथेतून भक्तांना पुण्यप्राप्त होणार आहे, परंतु भाविकांनी रामायणातील सार अंगीकारले तर जीवन सफल होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तर कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती यांनी नाशिकला भरणारा सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रार्थना केली. मराठवाडा येथील श्यामचैतन्य महाराज यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले. या पारायणाची शुक्रवारी समाप्ती करण्यात आली. डॉ. सुमनभाई यांनी रामकथेतील विविध प्रसंग कथेच्या माध्यमातून भाविकांना पटवून दिले. या तुलसीमानस रामकथेला त्र्यंबकेश्वरचे नरेंद्रगिरी महाराज रामानंदपुरी, दंडीमहात्मा, वैष्णव संत आदि उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी २०० भक्तगणांनी हजेरी लावली होती. सलग आठ दिवस सुरू असलेल्या तुलसीमानस रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेतला. (वार्ताहर)