पोकार कॉलनीत उद्या तुलसी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:16 IST2019-11-10T23:05:25+5:302019-11-11T01:16:47+5:30

इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक महिला मंडळ आण िश्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने दिंडोरीरोड पोकार कॅलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.१२) गोरजमुहूर्तावर तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यात सायंकाळी गावले महाराज यांचे तुळशी विवाहावर प्रवचन होणार आहे.

Tulsi wedding tomorrow in Pokar Colony | पोकार कॉलनीत उद्या तुलसी विवाह

पोकार कॉलनीत उद्या तुलसी विवाह

पंचवटी : इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक महिला मंडळ आण िश्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने दिंडोरीरोड पोकार कॅलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.१२) गोरजमुहूर्तावर तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यात सायंकाळी गावले महाराज यांचे तुळशी विवाहावर प्रवचन होणार आहे.
सायंकाळी मांडव व हळदी समारंभ, त्यानंतर प्रवचन, मिरवणूक आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाल्यावर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचे सुनील निरगुडे यांनी केले आहे.

Web Title: Tulsi wedding tomorrow in Pokar Colony