सिन्नर वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:56 IST2018-03-03T23:56:32+5:302018-03-03T23:56:32+5:30

सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली.

Tukaram seeds excitement in Sinnar Lecture | सिन्नर वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात

सिन्नर वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात

सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तुकोबांनी दाखविलेल्या भक्तिमार्गावर चालून आपण ईश्वरी कृपा प्राप्त करावी, असे प्रतिपादन कृष्णाजी भगत यांनी केले. यावेळी मनीष गुजराथी, बबन डोकफोडे, अंबादास भालेराव, सुशील देशमुख, संतोष सांगळे, सागर सानप, विकास घुगे, राहुल आंधळे, सचिन पानसरे, छाया पिले, विकास उकाडे, सचिन पांगारकर, कविता काळे यांच्यासह वाचक उपस्थित होते.

Web Title: Tukaram seeds excitement in Sinnar Lecture

टॅग्स :Nashikनाशिक