शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तुकाराम मुंढे यांनी वाढवलेल्या घरपट्टीवर २७ रोजी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:11 IST

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवारी (दि.२७) निकाल देणार आहे.

ठळक मुद्दे२०१८ मधील वादनगरसेवकांनी दिले आव्हान

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवारी (दि.२७) निकाल देणार आहे.

न्यायमूर्ती काथावाला आणि कुलाबावाला यांच्या समोर मंगळवारी (दि.२०) या याचिकेवर निकाल देण्यात येणार होता. मात्र, सुनावणी होऊ शकली नाही आता आता २७ आॅक्टोबर रोजी अंतिम निकाल देण्यात येणार आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी सांगितले.२०१८ मध्ये महापालिक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर घरपट्टी आणि मोकळ्या भूखंडाच्या घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यावेळी जनआंदोलने देखील झाली होती. त्यावेळी महासभेत करवाढ रद्द करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला होता. मात्र, महासभेचा निर्णय मुंढे यांनी दप्तरी दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिका म्हणजे आयुक्त आणि महासभा यांचे दोन विसंगत आदेश अमलात होते. महासभेचा ठराव रद्दबातल न करता आणि त्याची अंमलबजावणी न करता तो जैसे थे ठेवता येऊ शकतो काय असा प्रश्न करीत नगरसेवक गुरूमित बग्गा, शाहु खैरे, सलीम शेख आणि गजानन शेलार यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटी अंतर्गत मखलाबाद येथील गोकुळ पिंगळे, संजय बागुल यांच्यासह १६० मिळकतदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता सहा आठवड्यात शासनाने सुनावणी घ्यावी असे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत. मखलमलाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकल्पास परीसरातील अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेHigh Courtउच्च न्यायालय