शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत देवबंदी, वाहनात मात्र गणराय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:12 IST

सोशल मिडियावरही त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात होत्या

ठळक मुद्दे गणरायाची मूर्ती चर्चेचा विषय आयुक्तांनी या देवबंदीचे समर्थन केले

नाशिक - महापालिका खातेप्रमुखांच्या कार्यालयातील देव-देवतांच्या तसबिरी, मुर्ती हटविण्याचे आदेश नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असतानाच त्यांच्या शासकीय वाहनात मात्र, दर्शनी भागात बसविण्यात आलेली गणरायाची मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्याविषयी आचारांबरोबरच विचारांचीही सफाई होणे गरजेचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनातील काही विभागांना भेटी देऊन पाहणी केली होती. याच पाहणी दरम्यान, त्यांना कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी भिंतींवर, टेबलावर देवदेवतांच्या प्रतिमांसह मूर्ती आढळून आल्या होत्या. त्याबाबत मुंढे यांनी देवदेवतांच्या प्रतिमा-मूर्ती हटविण्याबरोबरच कार्यालयात साफसफाईचेही आदेश दिले होते. आयुक्तांनी दिलेल्या या आदेशानंतर महापालिका मुख्यालयात शनिवार-रविवार या सुटीच्या दिवशी युद्धपातळीवर साफसफाई मोहीम राबविली गेली. त्यात देवदेवतांच्या प्रतिमा-मूर्तीही हटविण्यात आल्या. देवदेवतांच्या प्रतिमा हटविण्याबाबतच्या या आदेशाबद्दल जनमानसात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पुरोगामी संघटना-नागरिकांनी या आदेशाचे स्वागत केले तर धर्म-संस्कृती रक्षकांकडून विरोधी प्रतिक्रिया आल्या. त्यातच, कार्यालयात देवबंदी करणा:या आयुक्तांना महापालिकेने दिलेल्या वाहनात दर्शनी भागात गणपतीची मूर्ती असल्याची वार्ता पसरल्याने या विरोधाभासाबद्दल चर्चेला उधाण आले. सोशल मिडियावरही त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात होत्या. दरम्यान, आयुक्तांनी या देवबंदीचे समर्थन केले असून आचारांबरोबरच विचारांचीही सफाई महत्वाचे असल्याचे स्पष्टीकरण वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिले आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे