प्रत्येक रु ग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न : गिरीश महाजन
By Admin | Updated: January 2, 2017 01:18 IST2017-01-02T01:09:36+5:302017-01-02T01:18:23+5:30
प्रत्येक रु ग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न : गिरीश महाजन

प्रत्येक रु ग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न : गिरीश महाजन
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी राज्यात आतापर्यंत २० जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिरे घेतली असून, या सर्व जिल्ह्यांमधून महाआरोग्य शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याती माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महाआरोग्य शिबिर एकप्रकारचा आरोग्याचा महाकुंभ असल्याचे अधोरेखित करताना ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या पुरविण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. महाशिबिरात अशा विविध भागातून रु ग्णांची तपासणी आणि उपचार दिले जात असून, रुग्णांना सेवा देण्याचा हा दिवस असल्याने स्वत: सर्व कक्षांमध्ये उपस्थित राहून रुग्णांच्या समस्या जाणून घेत असल्याचे महाजन म्हणाले. मुंबईपासून नाशिक शहर प्रवासासाठी जवळ असल्याने येथील महाशिबिरासाठी जागतिक ख्यातीच्या अनेक डॉक्टरांनी वेळ दिला आहे. त्यांचेही योगदान मोठे असून अनेक दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग, धार्मिक संस्थांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले आहे. शिबिरासाठी ७ ट्रक औषधे आणण्यात आली आहेत. स्थानिक डॉक्टरांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहकार्यामुळे महाआरोग्य शिबिर यशस्वी झाले, ही समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी महाआरोग्य शिबिरप्रसंगी लोकमतशी बोलताना त्यांच्या आरोग्यसेवेतील विविध पैलू उलगडले.