बंदूकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 22:45 IST2019-05-07T22:44:54+5:302019-05-07T22:45:09+5:30
सटाणा : मालेगाव रस्त्यावरील राजेंद्र ट्रेडिंग कंपनी होलसेल किराणा सेंटर मध्ये अज्ञात दरोडेखोरांनी एअरगनचा धाक दाखवून व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कंपनीचे मालक राका बंधु जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री अकराच्या दरम्यान घडली.

बंदूकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न
सटाणा : मालेगाव रस्त्यावरील राजेंद्र ट्रेडिंग कंपनी होलसेल किराणा सेंटर मध्ये अज्ञात दरोडेखोरांनी एअरगनचा धाक दाखवून व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कंपनीचे मालक राका बंधु जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री अकराच्या दरम्यान घडली.
मालेगाव रस्त्यावरील प्रमोद साखरचंद राका, राजेंद्र साखरचंद राका यांच्या मालकीचे राजेंद्र ट्रेडिंग कंपनी सेंटर आहे. राका बंधु व्यवहारासंदर्भात हिशोब करत असतांना दोन दरोडेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी राका बंधुना धमकावले. यावेळी राका बंधूंची दरोडेखोराशी झटापट झाली. सुटण्यासाठी राका बंधुंनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी पळ काढला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संश्यित फरार होण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतरा वर्षांपूर्वी राकांच्या निवासस्थानी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता. त्याचा आजही पोलीस यंत्रणेकडून तपास लागलेला नसतांना पुन्हा लुटीचा प्रयत्न झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.