पत्नीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 13, 2016 00:38 IST2016-09-13T00:37:43+5:302016-09-13T00:38:30+5:30
पत्नीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

पत्नीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
मनमाड : येथील नजराणा सोसायटीमध्ये राहणाऱ्या पत्नीला पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक करण्यात आली असून, जळीत महिलेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.
मेरी जॉर्ज जम्बो (३०) या विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने पती जॉर्ज जम्बो, सासू लोहिजा देवीदास जम्बो, नणंद लीना विकी मोहनराज यांनी वेळोवेळी शारीरिक छळ केला आहे. पती जॉर्ज याने माझ्या अंगावर रॉकेल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी जॉर्ज जम्बो यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरे करत आहे. (वार्ताहर)