वाहनांची मोडतोड करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: January 2, 2015 00:52 IST2015-01-02T00:51:43+5:302015-01-02T00:52:15+5:30
वाहनांची मोडतोड करण्याचा प्रयत्न

वाहनांची मोडतोड करण्याचा प्रयत्न
इंदिरानगर : ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही टवाळखोरांनी सुचिता मंगल सोसायटीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या चार आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य करीत वाहनांचे नुकसान केले. वाहनतळात घुसून अशाप्रकारे धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांच्या या कृत्यामुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत.
येथील जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या सुचिता मंगल सोसायटीच्या वाहनतळात उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनावर आॅईलपेंट टाकून गाडी खराब करण्यात आली, तर एका दुचाकीचे सीट फाडण्यात आले. सदर प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री जॉगिंग ट्रॅक लगत असलेल्या सुचिता मंगल सोसायटीच्या वाहनतळात शिरून टवाळखोरांनी गाड्यांचे नुकसान केले. याप्रकरणी रहिवाशांनी तातडीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. परिसरात वाहनचोरी, पेट्रोलचोरी तसेच वाहनांचे भाग चोरण्याचे प्रकार नियमित घडतच असतात. आता वाहनांचे नुकसान करण्यात आल्यामुळे या चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.