ट्रकची दुभाजकाला धडक, क्लिनर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:16 IST2018-03-18T01:16:17+5:302018-03-18T01:16:17+5:30

नाशिक : बांधकामाचे स्टील घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाला दिलेल्या धडकेत ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास वाडीवºहे शिवारातील शेवाळी विहीरलगत घडली़ ओमप्रकाश गौड (४८, रा़ उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे़

The truck's bunker hit the driver, the killer killed | ट्रकची दुभाजकाला धडक, क्लिनर ठार

ट्रकची दुभाजकाला धडक, क्लिनर ठार

ठळक मुद्देओमप्रकाश गौड असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू

नाशिक : बांधकामाचे स्टील घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाला दिलेल्या धडकेत ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास वाडीवºहे शिवारातील शेवाळी विहीरलगत घडली़ ओमप्रकाश गौड (४८, रा़ उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी नाशिकहून मुंबईला बांधकामाचे स्टील घेऊन ट्रक (एमएच ४६, बीबी २६६४) चालला होता़ मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शेवाळी विहीरलगत या ट्रकने रस्ता दुभाजकाला धडक दिल्याने अपघात होऊन यामध्ये ट्रकचा क्लिनर गौड हा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला़ त्यास निवृत्ती गुंड यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला़

Web Title: The truck's bunker hit the driver, the killer killed

टॅग्स :Nashikनाशिक