ट्रकचे टायर चोरणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 15:57 IST2018-08-30T15:56:36+5:302018-08-30T15:57:06+5:30

घोटी : घोटी शहर परिसरातील सिन्नर महामार्ग व मुंबई आग्रा महामार्गावर विश्रांतीसाठी उभ्या केलेल्या ट्रकचे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टायर चोरणाº्या चार जणांना घोटी पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या तपास पथकाने जेरबंद केले.

  Truck tire burglars seized | ट्रकचे टायर चोरणारे चौघे जेरबंद

ट्रकचे टायर चोरणारे चौघे जेरबंद

ठळक मुद्देया चोरटयांकडून दीड लाखाचे तयार जप्त केले आहेत. घोटी शहराजवळून जाणाº्या सिन्नर महामार्गावर रात्रीच्या वेळी अनेक वाहने विश्रांतीसाठी थांबत असतात.यात घोटी येथील व्यावसायिक मंगेश कडू यांची एम.एच.१९,झेड.४७१४ या क्रमांकाची ट्रक ही चालक तुकाराम डहाळे यांच्या सिन


घोटी :
घोटी शहर परिसरातील सिन्नर महामार्ग व मुंबई आग्रा महामार्गावर विश्रांतीसाठी उभ्या केलेल्या ट्रकचे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टायर चोरणाº्या चार जणांना घोटी पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या तपास पथकाने जेरबंद केले.या चोरटयांकडून दीड लाखाचे तयार जप्त केले आहेत.
घोटी शहराजवळून जाणाº्या सिन्नर महामार्गावर रात्रीच्या वेळी अनेक वाहने विश्रांतीसाठी थांबत असतात.यात घोटी येथील व्यावसायिक मंगेश कडू यांची एम.एच.१९,झेड.४७१४ या क्रमांकाची ट्रक ही चालक तुकाराम डहाळे यांच्या सिन्नर फाट्याजवळील घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्यानी या ट्रकची चारही चाके चोरी केल्याची घटना घडली होती.
जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे,अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार हा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आला होता.यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक एस.के.नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरु ळे,हवालदार ठाकरे,जुंद्रे,लोखंडे,पिंगळ व संदीप हांडगे आदींच्या पथकाने या तयार चोरीचा छडा लावला.यात घोटीतील भगवान किसन भोर,दीपक बाबुराव सोनवणे,जाकीर मोहहमद मनियार, व जालिंदर रामनाथ शिरसाट यांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली देत व सदरचे टायर मुसळगाव येथे विक्र ी केल्याची कबुली दिली.
दरम्यान तपास पथकाने मुसळगाव येथून टायर ताब्यात घेतले असून टायर विकत घेणाº्या मुसळगावातील सोमनाथ सुधाकर भागवत यासही ताब्यात घेतले आहे.

 

Web Title:   Truck tire burglars seized