शिंगवे शिवारात रस्त्याच्या कडेला ट्रक उलटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:24 IST2020-06-19T21:33:24+5:302020-06-20T00:24:05+5:30
मनमाड-उमराणे राज्यमार्गावर शिंगवे शिवारातील रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेली मुुले बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

शिंगवे शिवारात रस्त्याच्या कडेला ट्रक उलटून अपघात
दरेगाव : मनमाड-उमराणे राज्यमार्गावर शिंगवे शिवारातील रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने रस्त्याच्या कडेला खेळत असलेली मुुले बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
मनमाडपासून जवळच असलेल्या शिंगवे येथे उमराणेच्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकवरील (क्र.एमएच ४१, जी ५६६३) चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.
चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारात रस्त्याच्या कडेला शिवाजी झाल्टे यांच्या शेतात महिला मजूर मका पेरणी करीत होत्या. त्यांची मुलं शेजारी रस्त्याच्या कडेला बसलेली होती. आपल्याकडे येणारा ट्रक पाहून मुले जोरात ओरडली. क्षणभर कुणालाच काही कळाले नाही. भरधाव ट्रक मुलांजवळून एक फूट अंतरावरून जाऊन पुढे नालीत आदळला. सुदैवाने जीवितहानी टळली. रानमळा येथील वळण रस्ता अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. अपघातग्रस्त चालकाचे नाव समजू शकलेले नाही. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मनमाड-उमराणा रस्त्यावर ट्रक, ट्रॅक्टर व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.