कोटंबीजवळ ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:22 IST2020-06-16T22:12:08+5:302020-06-17T00:22:07+5:30
पेठ : नाशिक-गुजरात महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी गावच्या बसस्थानकानजीक असलेल्या फरशी पुलाला धडकून मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कोटंबीजवळ ट्रक उलटला
पेठ : नाशिक-गुजरात महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी गावच्या बसस्थानकानजीक असलेल्या फरशी पुलाला धडकून मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गुजरातकडून नाशिककडे कच्चा धागा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ४१ एयू ६७३५) सोमवारी रात्री कोटंबी घाट उतरल्यानंतर बसस्टॉपजवळ असलेल्या वळणावर उलटला. फरशी पुलाच्या कठड्याला आदळल्याने ट्रकमधील माल नदीपात्रात पडला. चालक किरकोळ जखमी झाला आहे.
घाटाच्या खाली असलेल्या कोटंबी गावाजवळ कायम रहदारी असून, महामार्गामुळे वाहने सुसाट जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या जिवास धोका असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक आहे.
- शशी भुसारे, ग्रामस्थ, कोटंबी
----------------
अपघाती वळण
ज्या ठिकाणी ट्रक उलटला त्या ठिकाणाहून अवघ्या दहा फुटांवर प्रवासी निवाराशेड आहे. दररोज या ठिकाणी प्रवासी उभे राहतात. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. राष्ट्रीय महामार्गाला लागून प्राथमिक शाळा असून, शालेय वेळात विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असल्याने सदरचे वळण धोकादायक बनले आहे. घाट उतरताना वाहनांवरील नियंत्रण सुटून या वळणावर अपघात घडत आहे.