घोटीजवळ महामार्गावर ट्रक उलटून वाहतूक ठप्प
By Admin | Updated: March 18, 2017 23:15 IST2017-03-18T23:15:25+5:302017-03-18T23:15:40+5:30
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील वैतरणा फाट्यावर शनिवारी सकाळी मुंबईकडे जाणारा मालवाहतूक ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

घोटीजवळ महामार्गावर ट्रक उलटून वाहतूक ठप्प
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील वैतरणा फाट्यावर शनिवारी सकाळी मुंबईकडे
जाणारा मालवाहतूक ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. अपघातानंतर वाहतूक
पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास मुंबईकडे लोखंडी सळया घेऊन जाणारा ट्रकचा (एमएच ४३ ई ८५३० हा घोटीजवळील वैतरणा फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने व चाके निखळल्याने ट्रक रस्त्यावरच आडवा पलटी झाला. यामुळे ट्रकमधील लोखंडी सळया रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या अपघातामुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती समजताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठप्प झालेली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली आहे. (वार्ताहर)