मालट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:38 IST2019-01-30T23:38:33+5:302019-01-30T23:38:59+5:30

चांदवड : तालुक्यातील मनमाड रोडवर मेसनखेडे शिवारात दत्ताचे शिंगवे फाट्याजवळ मालट्रकने दुचाकी-स्वारास धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

The truck hits two trucks; One killed | मालट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

चांदवड तालुक्यातील मेसनखेडे शिवारात ट्रकने धडक दिल्याने चक्काचूर झालेली दुचाकी.

ठळक मुद्देमेसनखेडे शिवार : गुन्हा दाखल

चांदवड : तालुक्यातील मनमाड रोडवर मेसनखेडे शिवारात दत्ताचे शिंगवे फाट्याजवळ मालट्रकने दुचाकी-स्वारास धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.
मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मनमाडकडे जाणाऱ्या भरधाव अशोक लेलण्डने (क्र. टीएन ५२ जे ३५१५) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाºया मोटारसायकलला (क्र. एमएच १५ सीवाय ५०१७) समोरून धडक दिल्याने मोटारसायकलस्वार सखाहरी देवमन पवार (४४ रा. उसवाड, ता. चांदवड) जागीच ठार झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, हवालदार नरेंद्र सौंदाणे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून मृतास चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. अधिक तपास नरेंद्र सौंदाणे हे करीत आहेत. ट्रकचालक पुरुषोत्तम एस. श्रीनिवासन नायडू (रा. तामिळनाडू) यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: The truck hits two trucks; One killed

टॅग्स :Accidentअपघात